spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राजधानीत अभिवादन

नवी दिल्ली :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते तसेच महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्याचा परिचय करून दिला.

Popular Articles