spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

एअर इंडिया इमारतीच्या नुतनीकरणात लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य द्यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांच्या अधिक गतिमान आणि सुलभ कार्यपद्धतीच्या दृष्टीने एअर इंडिया इमारतीचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. नूतनीकरण करताना लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एअर इंडिया इमारतीसंदर्भातील सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्दशित केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मुख्य सचिव यांनी याबाबत संबंधितांची एक बैठक घेऊन सविस्तर चर्चा करुन सुयोग्य नियोजन करावे. विविध शासकीय विभागांतील कोणत्या विभागांचे स्थलांतर एअर इंडियाच्या नुतनीकरण इमारतीत करणे हे प्रशासकीय आणि नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे ठरेल हे पाहावे. या ठिकाणी प्रशासकीय कार्यपद्धती ही सुलभ आणि लोकाभिमुख होईल यास प्राधान्य द्यावे. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.

वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, विकास चंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव (विशेष चौकशी अधिकारी) पंकज कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके; तसेच अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी, वास्तुविशारद उपस्थित होते. संभाव्य नुतनीकरण आराखड्यांचे सादरीकरण संबंधित वास्तुविशारदांद्वारे करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.