spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी

नागपूर :- साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नागपूर येथे अभिवादन व पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास नागपूर शहराच्या महापौर निता ठाकरे, स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष महेंद्र प्रधान, लहुजी शक्ती सेनेचे शहराध्यक्ष रमेश पाडण, विदर्भ संघटक बंटी इंगळे, विदर्भ उपाध्यक्ष सागर जाधव, लहुजी शक्ती सेना नागपूरचे कार्यकारी अध्यक्ष अंकुश बावणे, वाडी अध्यक्ष कृष्णा खोडके, युवा अध्यक्ष रोशन ठोसर, संजय डोंगरे, अंकित चन्ने, सविता पाडण तसेच लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Popular Articles