spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वातंत्र्यलढ्याचे झुंजार सेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना महावितरणतर्फे अभिवादन!

नागपूर :- ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा पुकारत ‘प्रतिसरकार’ची स्थापना करणारे, लोकशाही विचारांचे प्रणेते आणि शेतकरी, कामगार व शोषित घटकांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे स्वातंत्र्यलढ्याचे अमर सेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.

नागपूर येथील काटोल मार्गावरील विद्युत भवन या महावितरणच्या प्रशासकीय कार्यालयात हा अभिवादन सोहळा पार पडला. प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यकारी अभियंता अमित शिवलकर, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) सुधीर टेकाम, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, आणि उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांच्यासह प्रादेशिक व परिमंडल कार्यालयातील विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

Popular Articles