नागपूर :- दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी, बेसा, नागपूर या महाविद्यालयात दि. २७ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत “एँडवॉन्स अँनेलीटिकल इक्विपमेंट हँन्डलींग सर्टिफिकेट कोर्स” या अल्पकालीन अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर अभ्यासक्रमाचे आयोजन हे औषधीनिर्माणशास्त्र क्षेत्रातील (बी.फार्मसी, एम. फार्मसी व पी.एचडी) विद्यार्थ्यांकरिता करण्यात आले होते. या अल्पकालीन अभ्यासक्रमात औषधीनिर्माणशास्त्र क्षेत्रातील एकूण ४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. या अभ्यासक्रमात सकाळी सैद्धांतिक सत्रांमध्ये (HPLC, UV-Visible Spectroscopy, FTIR, Gas Chromatography, Molecular Docking, Good Laboratory Practices, QbD) अश्या अत्याधुनिक साधन व यंत्र उपकरणाचे विश्लेषणात्मक व तंत्रज्ञानावरील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन औषधीनिर्माणशास्त्र क्षेत्रातील प्राध्यापक डॉ. प्रशांत पुराणिक, डॉ. अमोल वरोकर, डॉ. सुचित्रा मिश्रा, डॉ. रुची शिवहरे, डॉ. विजयश्री रोकडे, डॉ. देवेश्री नांदुरकर, डॉ. जिग्नेश दोषी, डॉ. संध्या बागडे यांच्या द्वारे करण्यात आले. तसेच या अल्पकालीन अभ्यासक्रमाच्या दुपारच्या प्रात्यक्षिक सत्रांमध्ये (HPLC, FTIR, Gas Chromatography, UV-Visible Spectrophotometer, Spectrofluorophotometer, Particle Size Analyzer, Extruder-Spheronizer, Microwave Assisted Synthesis) आदी अत्याधुनिक साधन व यंत्र उपकरणांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आधुनिक विश्लेषणात्मक कौशल्ये आत्मसात केली. या अभ्यासक्रमातील प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने सदर अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या अल्पकालीन अभ्यासक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व अभ्यासक्रम समन्वयक डॉ. अमोल वरोकर आणि डॉ. संध्या बागडे यांनी मेहनत घेतली व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला महाजन यांनी सर्व सहभागीं विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
बालपांडे फार्मसी कॉलेज येथील “एँडवॉन्स अँनेलीटिकल इक्विपमेंट हँन्डलींग सर्टिफिकेट कोर्स” ला उत्स्फूर्त प्रतिसाद









