मुंबई :- प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणावरून आता मुंबईत राजकीय युद्ध पेटले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित कर्मचारी हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी संबंधित असल्याचा थेट आरोप सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी केला.
काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून सिद्धिविनायक मंदिरात कोट्यवधीची चोरी होत असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर सरवणकर यांनी पत्रकार परिषदेत वस्तुस्थिती मांडली. पत्रातील दाव्यांचा विपर्यास केला जात असल्याचे सांगत सरवणकर यांनी चोरीची घटना खरी असल्याचे मान्य सदा सरवणकर केले; मात्र न्यासानेच त्यावर कारवाई केल्याचा दावा केला.
मंदिरात गैरप्रकार घडत असल्याचे लक्षात येताच, न्यासाने तत्परता दाखवत वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. पोलिस तपासात आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे राजन पेंडुरकर, घाडीगावकर यांच्यासह नऊ कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. हे सर्व आरोपी काही दिवस तुरुंगातही होते, असे सरवणकर म्हणाले.
त्यांची नियुक्ती राऊत यांच्याकडून अटक करण्यात आलेल्या मुख्य कर्मचाऱ्यांना माजी महापौर विशाखा राऊत यांनी कामावर ठेवले होते. हे सर्वजण ठाकरे गटाच्या स्थानिक शाखेत नियमित जाणारे-येणारे असून त्यांच्या संपर्कात होते, असा दावा सरवणकरांनी केला.
ऑडिट व्हावे!
न्यासाच्या सतर्कतेमुळेच हे रॅकेट उद्ध्वस्त झाले आहे. कारवाईनंतर मंदिराच्या दैनंदिन निधीत मोठी वाढ झाली असून, या वाढीव दानाचे ऑडिट केले जावे, अशी मागणी विश्वस्त राहुल लोंढे केली.





