spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

संताजी जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संस्था स्तरीय समुपदेशन प्रवेश फेरी २०२६; प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

नागपूर :- संताजी जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रद्धानंद पेठ, नागपूर येथे संस्था स्तरीय समुपदेशन प्रवेश फेरी – २०२६ अंतर्गत प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे तसेच अर्ज निश्चिती करण्याची प्रक्रिया दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. संस्था स्तरीय समुपदेशनासाठी इच्छुक उमेदवारांनी दि. ९ व १० ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत लॉगिन करून प्रवेशासाठी नोंदणी करणे तसेच संस्थेमध्ये प्रत्यक्ष हजेरी लावणे आवश्यक आहे. दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता संस्थानिहाय गुणवत्ता यादी व समुपदेशनाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानंतर दि. १२ व १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत स्पॉट ॲडमिशन अंतर्गत संस्थेमध्ये प्रत्यक्ष समुपदेशन व प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. उपलब्ध जागा, गुणवत्ता क्रमांक व पात्रतेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश वाटप करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांनी त्याच दिवशी आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक राहील. दुसरी संस्था स्तरीय समुपदेशन फेरी दि. १७ ते २२ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीत दररोज सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत उमेदवारांनी हजेरी नोंदवावी. त्यानंतर दुपारी १.०० वाजता गुणवत्ता क्रमांकानुसार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच दुपारी १.०० वाजल्यापासून अंतिम उमेदवारापर्यंत समुपदेशन व प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. ज्या व्यवसायांमध्ये जागा शिल्लक राहतील, त्या जागांसाठी समुपदेशन प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यात येईल.

प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक सर्व मूळ कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या उपसंचालक सौ. श्वेता कुलकर्णी यांनी केले आहे. ही माहिती संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख सहदेव चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.