नागपूर :- पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना एसआयआर नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी. या उद्देशाने प्रेस क्लबमध्ये आयोजित दोनदिवसीय एसआयआर नोंदणी शिबिराचा आज उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. या उपक्रमामुळे पत्रकारांना आवश्यक शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली.
शिबिराच्या उदघाटनप्रसंगी महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका धनश्री देशपांडे, पूजा पाठक तसेच प्रभागातील बीएलओ उपस्थित होते. यावेळी शुभेच्छा व्यक्त करताना डॉ. इटनकर आणि प्रदीपकुमार मैत्र यांनी सांगितले की, एसआयआर हा राष्ट्रीय महत्त्वाचा उपक्रम आहे. त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून नागपूर शहरातील एसआयआर नोंदणीची उद्दिष्टे निश्चितपणे पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हे नोंदणी शिबिर ६ व ७ ऑगस्ट रोजी दररोज दुपारी २ ते ४ या वेळेत प्रेस क्लब येथे सुरू राहणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. नगरसेवक सुनील हिरणवार आणि नगरसेविका धनश्री देशपांडे यांनी एसआयआर नोंदणी दरम्यान कोणालाही अडचण आल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले. तसेच त्या अडचणी त्वरित दूर करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार भूपेंद्र गणवीर यांनी केले.यावेळी नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस अनुपम सोनी,पारितोष प्रामाणिक, सनी शेंडे, रणजित देशमुख, महेश उपदेव, सुनील मित्रा,अरूण आसटकर आदी हजर होते.





