spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नहराला पाणी सुटल्याने मौदा तालुक्यात युद्ध स्तरावर सुरू आहे भात लावणी, कोदामेंढी येथे तहसीलदारांनी केली भात लागवडीची पाहणी व प्रत्यक्ष मजुरांसह केली भात लावणी 

किशोर साहू, मौदा :- नुकतेच नहराला पाणी सुटल्याने, धानपट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौदा तालुक्यात गावागावात युद्ध स्तरावर भात लावणी सुरू असून,आज गुरुवार (ता. 06 ऑगस्ट )ला कोदामेंढी येथील शेतकरी लहानू बावनकुळे यांच्या शेतात तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी भात लागवडीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रत्यक्ष भात लावणी करून शेतीविषयक उपक्रमात सहभाग नोंदविला.

याप्रसंगी भगवान बावनकुळे मंडळ अध्यक्ष भाजपा मौदा तालुका,गोपाल गिरमेकर उपसरपंच ग्रामपंचायत कोदामेंढी,दुर्गा लांजेवार महसूल अधिकारी कोदामेंढी, गोपाल पाठे कृषी सहाय्यक अधिकारी कोदामेंढी, पंकज ठेंगणे मंडळ कृषी अधिकारी निमखेडा,निखिल बडवाईक रोजगार सेवक, देवानंद मेश्राम महसूल सेवक, दिपक हटवार,रामदास बावनकुळे ,लहानू बावनकुळे शेतकरी, कोदामेंढी तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. या भेटीदरम्यान भात लागवडीच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यात आली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

Popular Articles