spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आईचे दूध… बाळासाठी अमृत!”वडोदा येथे राष्ट्रीय स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृतीचा प्रेरणादायी उपक्रम

कामठी :- “पहिले सहा महिने केवळ आईचे दूधच बाळासाठी संपूर्ण आहार आहे,” हा महत्त्वपूर्ण संदेश देत वडोदा येथील अंगणवाडी क्रमांक ४ मध्ये राष्ट्रीय स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. माता व बालकाच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे उद्घाटन वडोदा ग्रामपंचायतीचे सरपंच राजू थोटे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बाल कल्याण विभागाच्या खंते , ग्रामपंचायत सदस्या अर्चना गाडबैल, डॉ. भोयर, लता ढोरे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमात नवमातांना स्तनपानाचे वैज्ञानिक महत्त्व, बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात त्याची भूमिका, कुपोषणापासून संरक्षण तसेच आईच्या आरोग्यास होणारे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम आणि नैसर्गिक संरक्षण कवच आहे,” असा संदेश उपस्थितांना देण्यात आला.

या उपक्रमामुळे स्तनपानाबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली असून उपस्थित महिलांनी कार्यक्रमाचे स्वागत करत अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Popular Articles