spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विमा योजनेबाबत बँक मित्रांना मार्गदर्शन

–  युको बँक सिर्सी शाखेत बैठक 

बेला :- नागपूर येथील विभागीय कार्यालयात सिर्सी येथील बँक मित्रांना (बिझनेस करस्पॉन्डट) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. यासंदर्भात,घेण्यात आलेली बैठक उत्साहात पार पडली.

बँकेचे विभागीय व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, उपव्यवस्थापक भुविद मुळे आणि बायोट्रॉनिक्सचे मुख्याधिकारी रवीकुमार मिश्रा यांनी याप्रसंगी सदर विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून देण्याचे आवाहन केले. त्यास बँक मित्रांनी प्रतिसाद दिला. बैठकीस बीसी (बँक मित्र) प्रतिनिधी अमित नवनागे, तेजस्वी नवनागे, किशोर सरोदे, प्रवीण धोपटे, कैलास रोडे आणि शीतल बारबडे उपस्थित होते. उपस्थित बीसींनी योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबींवर चर्चा करत नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

Popular Articles