spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत आज तिरंगा रॅली

– नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे महापौरांचे आवाहन

नागपूर :-  नागपूर महानगरपालिकातर्फे हर घर तिरंगा अभियान अंतर्गत रविवारी ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बाजीप्रभू चौक, रामनगर ते स्वातंत्रवीर सावरकर चौक पर्यंत मोठी तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून सन २०२२ पासून “हर घर तिरंगा” ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे, या सदर उपक्रम राबविण्यामागील मूळ कल्पना आहे. रविवार ९ ऑगस्टपासून या देशभक्ती अभियानाची सुरुवात होणार आहे. याची माहिती महापौर निता ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली.

कविवर्य सुरेश भट सभागृह परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत सत्ता पक्ष नेते नरेंद्र (बाल्या ) बोरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मुरुगनाथम एम., मुख्यमंत्री सचिवालयच्या उपसचिव आशा पठाण आणि समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ रंजना लाडे उपस्थित होते.

महापौर निता ठाकरे यांनी सांगितले की, तिरंगा रॅली मध्ये मनपाशाळेतील विद्यार्थीच्या सांस्कृतिक पथक सोबत राहणार आहे. तसेच शीख बांधव पारंपरिक वेष भुषेत राहणार आहे. या रॅली मध्ये माजी सैनिक सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे, ७०० मीटर लांब तिरंगा ध्वज हा या रॅलीचा मुख्य आकर्षण राहणार असून, यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येत भाग घ्यावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.

मनपाद्वारे शहरात १ लाख ७५ हजार तिरंगा झेंड्यांचे वाटप करणार आहे, असे सांगत महापौरांनी प्रत्येक नागरिकांना आपल्या घरी तिरंगा ध्वज लावावा असे आवाहन ही त्यांनी केले. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उपस्थितीत १० ऑगस्ट रोजी सकाळी तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनीचा उद्घाटन कविवर्य सुरेश भट सुरेश भट येथे करण्यात येणार आहे. तिथे मोठ्या आकाराची तिरंगा रांगोळी सुद्धा काढण्यात येणार आहे. भारताच्या फाळणीच्या भयावहता स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम १४ ऑगस्ट रोजी दयानंद पार्क जरीपटका येथे सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात येणार आहे. वंदे मातरम् वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता चिटणीस पार्क मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तसेच तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित केले गेले आहे.

महापौरांनी पुढे सांगितले की, सन २०२६ मध्ये हर घर तिरंगा मोहीम केंद्र शासनाच्या सुचनेप्रमाणे रविवार ९ ऑगस्ट पासून राबविण्याचे निर्देश राज्य शासनामार्फत करण्यात आले आहे. मोहिमेच्या अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने निर्गमित मार्गदर्शक सुचनांचे पालन करून शहराकरीता तिरंगे झेंडे वाटप करणार आहे. त्यात मनपा शाळा विद्यार्थी आर्थिक दुर्बल भागात झेंडेच्या वाटप करणार आहे. या प्रसंगी सहायक आयुक्त श्री नरेंद्र बावनकर, क्रीडा अधिकारी डॉ पियुष अंबुलकर आणि इतर उपस्थित होते.

Popular Articles