spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या सचिवपदी नियुक्तीबद्दल राजेश रंगारी यांचा सत्कार

नागपूर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या सचिवपदी राजेश रंगारी यांची नियुक्ती झाल्याबद्दल जगदीश नगर, काटोल रोड येथील कार्यालयात त्यांचा पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी अर्चना बडोले, नंदा बागडे, योगिता आगासे, शोभा नागुरकर, राधेश्याम राजपूत आणि माया बिसेन यांच्या वतीने राजेश रंगारी यांचा सत्कार करण्यात आला. रंगारी यांच्यावर पक्षाने सोपविलेल्या नवीन जबाबदारीबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच अनुसूचित जाती समाजासह वंचित व दुर्बल घटकांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा व नेतृत्वाचा लाभ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नवीन जबाबदारीच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Popular Articles