spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क साहित्य वाटप

नागपूर :- दिव्यांग, अंध, कर्णबधीरांना जयपूर फूटसह आवश्यक सहायक साहित्य देण्यासाठी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व मनपाच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट सभागृह परिसरात लाभार्थीच्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचा समारोप सोमवार १० रोजी सकाळी ९ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह येथे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर निता ठाकरे उपस्थित राहतील.

या समारंभाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांच्यासह खासदार माया इवनाते, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, आमदार परिणय फुके, आमदार कृपाल तुमाने, आमदार संजय भेंडे, आमदार राजीव पोद्दार, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास ठाकरे, आमदार मोहन मते, आमदार  समीर मेघे, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार डॉ. आशीष देशमुख, आमदार संजय मेश्राम, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त डॉ. विपीन, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विनायक महामुनी, अतिरिक्त आयुक्त अंकित, मुरुगानंथम एम. मुख्यमंत्री सचिवालय, सहासचिव आशा पठाण, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्ष नेता संजय महाकाळकर, धरमपेठ झोनच्या सभापती धनश्री देशपांडे, एमआयएमचे गटनेता शकील पटेल, मुस्लिम लिगचे गटनेता असलम मुल्ला खान, शिवसेना (उबाठा) गटनेता किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या आभा पांडे, बसपाच्या गटनेत्या हर्षला जयस्वाल, शिवसेनेचे गटनेता गणेश चर्लेवार, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती सारिका नांदुरकर उपस्थित राहणार आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.