spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अनधिकृत बांधकाम वापर करणाऱ्या धोकादायक आस्थापनांवर समन्वयाने कारवाई करा

– महापौर निता ठाकरे यांचे बैठकीत निर्देश

नागपूर :- नागपूर शहरातील अनधिकृत बांधकामे, अनधिकृत वापर व धोकादायक आस्थापनांविरुद्ध महानगरपालिकेच्या सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे, समन्वयाने व कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी. असे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी दिले.

नागपूर शहरातील अनधिकृत बांधकामे, मंजूर बांधकाम नकाशाविना करण्यात आलेले बांधकाम, अनधिकृत वापरबदल, अग्निसुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आस्थापना तसेच अतिक्रमण याबाबत संबंधित विभागांच्या समन्वयाने प्रभावी कार्यवाही करण्यासाठी शनिवारी (ता.८) महापौर निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली.

याप्रसंगी सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर स्थापत्य व बांधकाम विशेष समिती सभापती अश्विनी जिचकार, अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती रूपाली ठाकूर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त मंगेश खवले, नगररचना विभाग, संबंधित झोनचे सहायक आयुक्त, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, विभागीय अग्निशमन अधिकारी व सर्व केंद्र अधिकारी, अग्निशमन विभाग तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महापौर निता ठाकरे यांनी प्रत्येक झोनमध्ये किमान १० प्रकरणे निश्चित करून त्यावर संयुक्त कार्यवाही करणे, नगररचना विभागाकडून मंजूर बांधकामांची झोननिहाय माहिती घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीशी पडताळणी करणे आणि गंभीर उल्लंघनांवर कोणतीही तडजोड न करता कायद्यानुसार कठोर कार्यवाही करणे, बाबत प्रमुख निर्देश दिले.

Popular Articles