कामठी ता ५ :– महसुल सप्ताह अंतर्गत आज कामठी तालुक्यातील महालगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमअंतर्गत तहसील कार्यालयाचे विविध योजना,संजय गांधी निराधार योजना,डीबीटी रेशन कार्ड बनविणे व दुरुस्ती,आधार अपडेट करणे, विविध दाखले, देत आधार कार्ड, पुरवठा विभाग संबंधीत विविध प्रमाणपत्र देण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार गणेश जगदाळे, नायब तहसीलदार राजीव बमनोटे माजी सरपंच प्रांजल वाघ,महालगाव,कढोली, गुमथळा, भोवरी ग्रा प चे सरपंच गण प्रामुख्याने उपस्थित होते.




