कन्हान :- महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री तथा जनतेचे लोकप्रिय नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बद्दल मनोज जरांगे यांनी केलेल्या कथित अपशब्दांच्या वक्तव्याचा सकल ओबीसी समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
या वक्तव्याच्या निषेधार्थ सकल ओबीसी समाजाच्या वतीने कन्हान येथील मुख्य चौकात मनोज जरांगे यांचा प्रतिकात्मक पुतळा फुंकुन जोरदार निषेध नोंदविण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी केली.
यावेळी अतुल हजारे, राहुल किरपान, चेतन खडसे, मनोज गिरी, शिवशंकर चकोले, अक्षय श्रावणकर, सतीश वाडीभस्मे, राणु शाही, अमिष रुंघे, विक्की सोलंकी रविंद्र कोतपल्लीवार, सौरभ पोटभरे, सचिन कांबळे, आकाश वाढणकर, संजय चोपकर, रोहित चकोले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सकल ओबी सी समाजाच्या वतीने आयोजित या निषेध आंदोलना दरम्यान शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहनही करण्यात आले.








