spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान येथे शिवभक्तांचा जल्लोषात कावड यात्रा संपन्न

 ” हर हर महादेवा ” च्या जयघोषाने दुमदुमली कन्हान नगरी. 
 
कन्हान ५ : – शहरात विविध संघटन द्वारे श्रावण महिन्या चा पाश्वभुमीवर रविवार (दि.३) जुलै रोजी विशाल कावड यात्रा काढुन शहरात भ्रमण करून शिव पंचाय त हनुमान मंदिर शिव जलाभिषेक, पुजा, अर्चना करित महाप्रसाद वितरण करून कावड यात्रेची सांगता करण्यात आली.
        कन्हान नदी पात्रातुन कलशात पवित्र जल भरुन शिव पंचायत हनुमान मंदिर येथुन विशाल कावड यात्रा महामार्गानी काढण्यात आली. महिलांनी डोक्यावर कलश आणि पुरुषांनी खांद्यावर कावड घेऊन कावड यात्रा नागपुर – जबलपुर महामार्गाने आंबेडकर चौक, तारसा रोड चौक, गहुहिवरा चौकातुन परत तारसा रोड चौक, आंबेडकर चौक ते यात्रेचे शिव पंचायत हनुमान मंदिर येथे समापन करण्यात आले.  मार्गक्रमण करित असताना ” हर हर महादेवा ” च्या जयघोषाने कन्हान नगरी दुमदुमून गेली होती. कावड यात्रेत भगवान शिव शंकर यांच्या मुर्तीसह, अमरनाथ बर्फाची शिव पिंडी, नंदी सह विविध झांकी मुळे परिसरात शिव भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. कावड यात्रेचे ठिकठिका णी, फुलांच्या वर्षाव, केळी, फळ, फराळी पॉकेट वितर ण करुन शिवभक्तांनी कावड यात्रेचे जल्लोषात स्वाग त केले.
           शिव पंचायत हनुमान मंदिर येथे शिव भक्तांनी कलश मधिल पवित्र जल भगवान शिव शंकर, देवी पार्वती च्या चरणी अर्पण करून पाऊस चांगला पडु दे , बळीराजा ला सुख शांती दे अशी हजारो शिव भक्तां नी प्रार्थना केली. पूजा अर्चना व महाआरती करून महाप्रसाद वितरण करण्यात आला आणि कार्यक्रमा ची सांगता करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त यात्रेत सहभागी झाले होते. यात्रे दरम्यान कुठलाही अनुचित घटना घडु नये म्हणुन पोलीस निरी क्षक वैजयंती मांडवधरे यांचा मार्गदर्शनात पोलीसांचा तगडा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Popular Articles