spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मातोश्री कौशल्याबाई बोगावार महाविद्यालयात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा

गडचिरोली :- शहरालगतच्या नवेगाव-मुरखळा येथील मातोश्री कौशल्याबाई बोगावार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक संचित बोरकर, ग्रंथपाल वर्षा काटकर, कनिष्ठ सहाय्यक राहुल दुधे, संगीता मारगोणी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Popular Articles