spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

टेंडरमधील टक्केवारीचा मातोश्री पॅटर्न काय होता हे एकदा महाराष्ट्राला सांगाच

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघात

मुंबई :- जनाब संजय राऊत, टेंडरमध्ये पंचवीस टक्के कमिशन घ्यायचा मातोश्री पॅटर्न महाराष्ट्राला माहित आहे. याच मातोश्री पॅटर्नच्या जोरावर तुम्ही दोन-दोन मातोश्री उभ्या केल्यात. गटारात, टॉयलेटमध्ये, खड्ड्याच्या प्रत्येक कामात पैसे घ्यायचे, हा धंदा तुमचा आहे. कमिशनखोरी आणि खंडणीवसूली ही परंपरा तुमची आहे. त्यामुळे मातोश्री पॅटर्न काय होता हे एकदा महाराष्ट्राला सांगा आणि मग जामनेर पॅटर्नच्या गप्पा करा, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला.

नाशिकमधील खड्डे बुजवण्यासाठी नाशिक महापालिका, तिथले जिल्हा प्रशासन अतिशय सक्षम आहे. नाशिकचे खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कारण नाशिकची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, गिरीश महाजन यांनी घेतली आहे. तिथे जाऊन नाटकीपणा करण्यापेक्षा आपल्या उबाठा गटात मोठमोठे खड्डे पडले आहेत, अख्खा पक्ष खड्ड्यात गेलाय तो वाचवण्याचा प्रयत्न करा आणि मग इतरांवर टीका करा. संजय राऊत, कुंभकर्ण कोण आहे, हे सांगण्यापेक्षा तुम्ही अहंकारी रावण आहात आणि महाराष्ट्र लुटून अडीच वर्षं आणि 25 वर्षं मुंबई महापालिकेत लूट करून सोन्याची लंका उभी केली आहे, ते पहा. तुमची सोन्याची लंका आणि तुमचा अहंकार उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात बन यांनी फटकारले.

संजय राऊत, तुम्ही राहुल गांधींच्या खिशात आहात. सुकलेला पापड आणि सुकलेले बोंबील तुमचे आणि तुमच्या मालकाचे झालेय. तुमची सत्ता गेल्याने, कमिशनखोरी बंद झाल्याने तुमचा जळफळाट होतोय. देवेंद्रजी फडणवीस सक्षमपणे आणि समर्थपणे महाराष्ट्राचा कारभार करतायत. तुमचे सुकलेले बोंबील आणि सुकलेला पापड जनतेने केलाय. तुमची कमिशनखोरी आणि दुकानदारी बंद झाल्याने तुमचा हा जळफळाट आहे. तुम्ही नाशिकमध्ये जाऊन आंदोलन करण्याचा, मोर्चा काढण्याचा प्रयत्न करताहात. त्यापेक्षा सुकलेला बोंबील झालेल्या आपल्या मालकाकडेही जरा लक्ष द्या, असे बन यांनी सुनावले.

कुंभमेळ्यात हजारो साधुसंत आणि लाखो हिंदू एकत्र येणार असल्याने संजय राऊत यांचा विरोध असल्याचे सांगून बन म्हणाले, हिंदू एकत्र आले की संजय राऊत यांचे पोट दुखते. तुमचा इज्तेमाला विरोध नाही, तुम्हाला अल्पसंख्यांकांच्या दाढ्या कुरवाळायला विरोध नाही. लाखो हिंदू नाशिकमध्ये येणार त्यांना बदनाम करण्याची सुपारी तुम्ही घेतली आहे. मात्र काळजी करू नका, कुंभमेळ्याच्या निमित्ताने लाखो हिंदू एकत्र येतील. कुंभमेळा अतिशय चांगला होईल. तुमची कितीही पोटदुखी झाली आणि तुम्ही जनाबगिरी आणि औरंगजेबाचा फॅन क्लब चालवण्याचा प्रयत्न केला तरी तुमचं हे षड्यंत्र यशस्वी होणार नाही. हिंदू एकत्र येऊ नये, तो वेगवेगळ्या जातींमध्ये विभागला पाहिजे, ही तुमची मानसिकता आहे. पण हिंदू सारा एक हा मंत्र या कुंभमेळ्यातून जाणार आणि तुमच्यासारख्या जनाबांची, शिल्लक सेनेची, औरंगजेब फॅन क्लबची पळता भुई थोडी होईल.

Popular Articles