spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस व कन्हान यूथ फाउंडेशन तर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात

कन्हान :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कन्हान यूथ फाउंडेशन आणि दुकानदार संघ कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कन्हान-पिपरी नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. मनोहर पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सभापती शंकर चहांदे होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर बेलसरे, कन्हान यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन सतीश बेलसरे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील, जिल्हा महासचिव श्रीराम नांदुरकर, रामटेक विधानसभा अध्यक्ष गणेश पानतावणे, सुनील लाडेकर, अल्पसंख्याक सेलचे शफीक शेख, अकरम शेख, पुरणदास तांडेकर, नरेंद्र वाघमारे, डॉ. रणवीरसिंह वर्मा, माया भोयर, निशा ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवरांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ज्ञानेश्वर विघे, श्याम सुंदर पिपलवा, एन. एस. मालविये, दिनेश ढोके, सूर्य भान फरकाडे, बबनराव रायपुरे, अशोक अहिरकर, नत्थुजी चरडे, पुरुषोत्तम कुंभलकर, रमेश जामदार, देवीदास तडस, दिगंबर हारगुडे, शशीकला बागडे, दीक्षिता सोमकुंवर, भारती वानखेडे, दीक्षा आंबीलढुके , विमल मालाधारी व राजश्री पाटील यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन शफीक शेख यांनी तर आभार सुनील लाडेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शैलेश झेंडे, नितेश भरणे, चेतमणी मिश्रा, मोंटु भोयर, पवन सरोदे, रोतेश पात्रे, वैभव मस्के, शुभम रामटेके, विष्णु बेहरा, आकाश वाढणकर, मानवटकर, राहुल रामटेके,कन्हान महिला अध्यक्ष सुवर्णा रामापुरे, कन्हान शहर अध्यक्ष संदीप कभे, कांद्री महिला अध्यक्ष निशा ठाकरे, कांद्री शहर अध्यक्ष भगवान सरोदे आदींनी परिश्रम घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.