spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वातंत्र्य दिन निमित्ताने खाप्यात तिरंगा बाईक रॅली,”तिरंगा बाईक रॅलीने शहर दुमदुमले”

खापा, वार्ताहर :- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर नगर परिषद खापा यांच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत शहरातील युवकांसह शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दुचाकींवर तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीच्या जोशात नागरिक सहभागी झाले होते.

नगर परिषद कार्यालयातून सुरू झालेली रॅली खापा शहरातील विविध प्रमुख मार्ग, नवी वस्ती तसेच मॉयल परिसरातून मार्गक्रमण करत पुढे गेली. रॅलीदरम्यान तिरंग्यांनी सजलेल्या दुचाकी आणि देशभक्तीच्या घोषणांमुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. युवकांसह सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी नगराध्यक्ष पीयूष बुरडे, मुख्याधिकारी सचिन राऊत, उपाध्यक्ष सुनील पाहुणे, शहरातील नागरिक, तरुण, तरुणी, पोलीस कर्मचारी, नगर परिषद अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शहरवासी उपस्थित होते.

तिरंगा बाईक रॅलीमुळे खापा शहरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित झाला असून, ‘देश प्रथम’ या भावनेचा जागर नागरिकांच्या सहभागातून दिसून आला.

Popular Articles