नागपूर :- सविधान लोकशाही समता फाउंडेशन तर्फे 15 ऑगस्ट 2026 ला दुपारी 3 वाजता संविधान चौक नागपूर येथून न्यायात्रेच्या शुभारंभ यशवंत तेलंग यांच्या नेतृत्वात करण्यात आला. याप्रसंगी उपरोक्त फाउंडेशनचे मुख्य संयोजक योगेश ठाकरे, संदीप सिंग यांच्या शुभहस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला भव्य पुष्पमाला अर्पण करण्यात आले. न्यायात्रेला विजय खवसे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी यशवंत तेलंग, योगेश ठाकरे, संदीप सिंग, यांनी न्यायात्रेच्या तर्फे पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निहाल पाटील, दादाराव तायडे, आशिष मेश्राम, नरेंद्र सोमकुवंर, भोजराज सरोदेसह शेकडो नागरिकांनी या न्याय यात्रेला मनपूर्वक हृदयात्मक शुभेच्छा दिल्यात. ही न्याययात्रा शिक्षण, आरोग्य, रोजगार महिला वरील अत्याचार, जल जमीन जंगल ची लूट थांबवणे मानव कल्याणात काळाची गरज आहे. देशातील 94 हजार शाळा बंद झाल्या असून 1.2 लाख शाळा रस्त्याविना आहेत. मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश, ओडीसा, झारखंड, मध्य प्रदेश सह इतर राज्याची स्थिती भयानक असून एक लाख शाळा, एक शिक्षक शिकवणाऱ्या असून राज्यात 1793 शाळा एकही विद्यार्थी नाही चाळीस टक्के मुलं बारावीपर्यंत जात नाही शिक्षणावर 3.10 लाख करोड रुपये असून ते कमी आहे. तो देशाच्या जे काही उत्पन्न किंवा मुनाफ आहे त्याच्या 25% रेव्हनीचा असायला पाहिजे 520 करोड रुपये रख रखाव आणि मरमत करिता आवंटित आहे. ओएनजीसी या सरकारी उपक्रमाच्या कंपनीकडून संस्थांना 668 करून फंड देण्यात आला असून 16000 करोड रुपये अडाणी समूहाला माफ करण्यात आले असंख्य अनेक उद्योगपतींना दहा हजार करोड पडतो. त्यावर आजपर्यंत माफ करण्यात आले. तरी त्यांची आर्थिक स्थिती श्रीमंताच्या यादीत आहे आणि गरीब कर्जदाराला शिक्षा भोगावी लागत आहे. लाखाच्या वर महिला अत्याचार ग्रस्त झालेल्या असून प्रशासनाच्या उदासीनतेने न्याय मिळण्यास विलंब होत असल्याने न्यायालयीन प्रशासकीय व्यवस्थेने ताशेरे ओढलेले आहे. अशा बेजबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून अत्याचार ग्रस्त लाखो महिलांना न्याय द्यावा. जल जमीन जंगल ची लूट सुरू असून एक रुपये वार्षिक रिलीज वर उद्योगपतींना देऊन हजारो वर्षाचे जंगल मोठ्या मशनरी लावून उध्दस्त करण्यात येत आहे. त्याचा परिणाम मानवाला धरतीवर वायू प्रदूषण ऑक्सिजन आरोग्यावर होत असून या सर्व प्रश्नांना घेऊन न्याययात्रा 15 ऑगस्ट 2026 ते 26 नोव्हेंबर 2026 ला दिल्ली येथे 11 लाख स्वाक्षरी निवेदन सादर महामहीम राष्ट्रपतींना माननीय यशवंत केलं योगेश ठाकरे संदीप सिंग यांच्या नेतृत्वात शिस्त मंडळ सादर करणार असून सर्व राज्यातील नगरसेवक आमदार खासदार व जिल्हाधिकारी या मान्यवरांना वरील प्रश्नावर न्यायक निवेदन व एक वृक्ष देऊन 11 लाख स्वाक्षरी निवेदने न्यायात्रेद्वारे देणार असून ती न्यायात्रा या सर्व प्रश्नावर न्याय मागणार आहे तेव्हा जनतेने या प्रशासकीय उदासीन यंत्रणेवर आपल्या निवेदनावर स्वाक्षऱ्याकडून मोठ्या संख्येने आपण न्यायात्रेला सफर करण्याचे आवाहन यशवंत तेलंग योगेश ठाकरे आणि संदीप सिंग यांनी केलेले आहे.
शिक्षण आरोग्य रोजगार महिला वरील अत्याचार जल जमीन जंगल लुट थांबवणे मानव कल्याणात काळाची गरज – यशवंत तेलंग









