spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आदिवासी ढिवर समाज संघटनेतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात

नागपूर :- आदिवासी ढिवर समाज संघटने तर्फे स्व. खासदार जतिराम बर्वे तसेच स्वातंत्र्यदिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेमकुमार गजघाटे समाजसेवक धनराज कर्णुके आणि मनोज नगरे, वनिता नगरे व  रश्मि नान्हे यांची उपस्थिती होती. यावेळी समाजातील दिवंगत व्यक्तींच्या स्मृतींना अभिवादन करून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला समाजातील महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Popular Articles