spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विश्रांती कॉन्व्हेंट स्कूल निमखेडा येथे स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

किशोर साहू, मौदा :- निमखेडा येथील विश्रांती कॉन्व्हेंट स्कूलने आपला ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने, देशभक्तीने आणि अभिमानाने साजरा केला. संपूर्ण शाळा परिसर तिरंगी फुगे, झेंडे आणि सुंदर पताकांनी सजवण्यात आला होता. सकाळी ८:०० वाजता शाळेच्या मुख्याध्यापिका शांता खांडेकर, रक्षक खांडेकर, शाळेच्या अध्यक्षा विश्रांती खांडेकर आणि संपादक बिंदू तागिरिसा यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे विशाल खांडेकर, गणेश आटे,प्रणय नेरलेवार आणि गावकरी उपस्थित होते. शाळेच्या प्राचार्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण केले आणि मुलांना देशाचे जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणा दिली.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मिठाई वाटण्यात आली.

Popular Articles