spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ग्रामपंचायत कार्यालय येसंबा येथे समाधान दिवस साजरा 

किशोर साहू: मौदा , ता.७: गावातील नागरिकांच्या समस्या प्रलंबित न राहता गावातच सोडविण्यासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून व जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या आदेशान्वये आठवड्यातील प्रत्येक बुधवारला प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात समाधान दिवसाचे आयोजन करण्यात येते. महसूल विभाग, कृषी विभाग सह इतर विभागातील गाव पातळीवरील अधिकारी वर्ग उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांचे समाधान करतात. त्यानुसार आज बुधवार( दि. ०६ ऑगस्ट) ला तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय येसंबा येथे ग्रामस्तरीय प्रशासन तालुका मौदा यांच्या वतीने समाधान दिवस घेण्यात आला. आलेल्या समस्याग्रस्त नागरिकांचे समाधान करण्यात आले.याप्रसंगी चाचेर मंडळ अधिकारी काळे, तलाठी गजानन पारधी, उपसरपंच धनराज हारोडे, पोलिस पाटील नरेंद्र राऊत,रोशन खेरगडे, अंगणवाडी सेविका माया चकोले, विठ्ठलराव महाल्ले, इंद्रराज मेश्राम, हजर होते.

Popular Articles