spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शाळा सुरु आणि सुटण्याच्या वेळ पोलीस कर्मचारी तैनात करण्याची मागणी

 
मुख्याध्यापिका, शिक्षक आणि पालकांचे पोलीस विभागाला निवेदन. 
 
कन्हान ७ : – बी.के.सी.पी शाळा सुरु आणि सुटण्याच्या वेळेस शाळेच्या गेटजवळ आणि महामार्गावर पोलीस कर्मचारी तैनात करण्याची मागणी मुख्याध्यापिका कविता नाथ, शिक्षक आणि पालकांनी सहायक पोली स निरीक्षक रोशन बावनकर हयांना निवेदन देऊन केली आहे.
        बीकेसीपी शाळेत सुमारे १३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सकाळी शाळा सुरु होण्याचा आणि सुटण्या चा वेळी शाळेच्या गेटजवळ मोठ्या प्रमाणात विद्यार्थां ची गर्दी होते. त्यांचे पालक, सायकल, ऑटो, व्हॅन, बस , कार, दुचाकी वाहनाची गर्दी रोज होत असते. शाळे च्या समोरील चौकात कन्हान कडुन कामठी कडे जाण्यास वळण महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनां ची वर्दळ असते. शाळा सुटल्यावर विद्यार्थी सायकलने त्याच मार्गाने घरी जात असतात अश्यावेळी मोठ्या अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही. बीकेसी पी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता नाथ यांचा नेतृत्वा त, शिक्षक आणि पालकांनी सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर यांची भेट घेऊन गंभीर विषयावर चर्चा केली आणि निवेदन देऊन शाळा सुरु आणि सुट ण्याच्या वेळी शाळेच्या गेटजवळ आणि महामार्गा वरील वळणावर नियमित पोलीस कर्मचारी तैनात करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी शिक्षक अमित ठाकुर, सनोज पनिकर, पालक लोकेश दमाहे, विजय गडे, नितिन अवस्थी, आनंद शर्मा, गजानन रहाटे, प्रशांत वाघमारे, हरिष तिडके, प्रशांत मसार, प्रदीप गायकवाड, गुड्डा सुर्यवंशी सह बहुसंख्येने पालक गण उपस्थित होते.
पोलीस विभागा कडुन निवेदनाची दखल
        बीकेसीपी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता नाथ यांचा लेखी निवेदनाची कन्हान पोलीस विभागा कडुन दखल घेभन सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावन कर यांनी निवेदन घेतल्यानंतर वाहतुक कर्मचारी आकाश खोब्रागडे, सूरज कांबळे यांना आवश्यक सुचना दिल्या. वाहतुक पोलीसांनी शाळा सुटल्यावर महामार्गावर उभे राहुन वाहतुक सांभाळली. विद्यार्थां ना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि मोठा अपघात घडु नये या उद्देशाने पोलीसांनी कारवाई केली . दररोज शाळा सुरू आणि सुटल्यावर वाहतुक पोली स कर्मचारी महामार्गावर उभे राहुन विद्यार्थांना दिलास देणार काय ? याकडे शिक्षकांचे, पालकांचे लक्ष लागले आहे .

Popular Articles