नागपूर :- राष्ट्रीय चर्मकार महासंघ, शाखा नागपूर व श्री संत रविदास छात्रालय संस्थेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता. श्री संत रविदास सांस्कृतिक सभागृह, हनुमान नगर, नागपूर येथे होणार आहे. या कार्यक्रमात समाजातील इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब घोलप असून उद्घाटक म्हणून खासदार श्यामकुमार बर्वे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमा प्रसंगी मुख्य अतिथी पाहुणे म्हणू ॲड. डॉ. पी एस चंगोले यांची उपस्थिती राहतील. तसेच प्रमुख अतिथी पाहुण्यांमध्ये महापौर नीता ठाकरे, आमदार मोहन मते, अभिजीत वंजारी, भाऊ दायदार, माधवराव गायकवाड, महेंद्र भागवतकर, भूषण मांडस्कर, संजय महाकाळकर, लखन येरवार, योगेश पाचपोर, माधुरी बाविस्कर, रमेश तांबटकर, लीलाधर कानोडे, मीना भागवतकर आणि पंढरीनाथ तांबटकर यांची उपस्थिती राहतील. तसेच समाजबांधवांनी व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रदेश सचिव लीलाधर कानोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे तथा आयोजकांनी केले आहे.








