– भाजपा चाचेर मंडळ अध्यक्ष रवी चव्हाण यांनी मानले आभार
किशोर साहू, मौदा :- रामटेक विधानसभा क्षेत्रातील चाचेर मंडळ अंतर्गत येत असलेल्या गावातील व रामटेक क्षेत्रातील इतरही गावातील गरजू कुटुंबांना गरिबांच्या हक्कांसाठी सेवेसाठी नेहमीच पुढाकार घेणारे माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून मंगळवार (ता. 18 ऑगस्ट) ला तालपत्रीचे वाटप करण्यात आले. गरीब कुटुंबांना त्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात देण्याचा हा छोटासा प्रयत्न केला.
समाजसेवा हीच खरी लोकसेवा आणि लोक सेवेतूनच जनतेच्या विश्वास प्राप्त होतो.
माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून ,भाजपा चाचेर मंडळ अध्यक्ष रवी चव्हाण यांच्यासह तालपत्रीच्या लाभ घेतलेल्या सर्व कुटुंबांतील सर्व सदस्यांनी माजी आमदार रेड्डी यांची आभार मानले आहे.








