spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सणांच्या पार्श्वभूमीवर कन्हान पोलिसांकडे सुरक्षा व वाहतूुक व्यवस्था मजबूुत करण्याची मागणी

कन्हान :- आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कन्हान परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेव ण्यासोबतच नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी कन्हान मधिल जागरूक नागरिकांनी कन्हान पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक पाटणकर कडे निवेदन सादर केले. सामाजिक कार्यकर्ते संदीप शेंडे व नितीन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

आगामी काळात पोळा, गणेशोत्सव, दुर्गापूजा, धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच दीवाळी यांसारखे प्रमुख सण येत असुन या काळात कन्हान शहरातील मुख्य बाजारपेठा, चौक, रस्ते तसेच विविध मंडळांच्या मंडपा त नागरिकांची मोठी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर कोण ताही अनुचित प्रकार घडु नये आणि सण-उत्सव शांत तेत पार पडावेत, यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

निवेदनातुन मुख्य बाजारपेठा व संवेदनशील ठिकाणी महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त पोलिस बंदो बस्त तैनात करावा, दिवस-रात्र पोलिस गस्त वाढवावी, गर्दीच्या मार्गांवर वाहतुक नियंत्रणासाठी विशेष व्यव स्था करावी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशाती ल पोलिसांची नियुक्ती करावी तसेच मुख्य चौक व मंडप परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवा वेत अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

सण-उत्सवांच्या काळात नागरिकांनी ही पोलिस प्रशासनाला सहकार्य करून शांतता व सुव्यवस्था राखावी असे आवाहन सपोनि पाटणकर यानी यावेळी केले. कन्हान पोलिस प्रशासनाकडुन यंदाही प्रभावी सुरक्षा व्यवस्था राबवुन नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिले जाईल, असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप शेंडे, नितीन मेश्राम, प्रशांत मसार, अजय चव्हा ण, नरेश चिमणकर, हरिश तिडके, रोशन फुलझेले, रॉबीन निकोसे , गणेश भालेकर सह कन्हान परिसरा तील अनेक जागरूक नागरिक उपस्थित होते.

Popular Articles