– व्यवसायाच्या धावपळीतून विरंगुळा; स्नेह, मनोरंजन आणि बंधुभावाचा अनोखा संगम
कामठी :- कामठी व्यापारी असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘व्यापारी मिलन २०२६’ हा भव्य स्नेहमेळावा मोगरकसा येथील आनंदवन रिसॉर्टमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. व्यवसायाच्या धावपळीतून काही क्षण विरंगुळा मिळावा, तसेच व्यापाऱ्यांमधील स्नेह, आपुलकी आणि बंधुभाव अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता वैद्य काका आणि रामजी बंसवानी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर नाश्त्याचा आस्वाद घेत अँकरच्या माध्यमातून विविध मनोरंजक खेळ व कार्यक्रम घेण्यात आले. या खेळांमध्ये व्यापाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत मनमुराद आनंद लुटला.
दुपारी सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर स्विमिंग पूल आणि पूल पार्टीचा आनंद घेतला. व्यापाऱ्यांनी व्यावसायिक धावपळ बाजूला ठेवून मित्रपरिवारासोबत मनसोक्त मनोरंजन केले. सायंकाळी हाय-टीचा आस्वाद घेतल्यानंतर सर्व व्यापारी आनंददायी आठवणी घेऊन कामठीकडे रवाना झाले.
या व्यापारी मिलनात सुनील खानवानी, ओम बंसवानी, रवि किशनानी, विकी राजपाल, बबलू भाई, अजय थडानी, इस्राइल भाई, अनिल चौधरी, रवि नानकानी, दिलीप नानकानी, नीलेश नानकानी, दिनेश बावनकर, राजा सचदेव, श्याम सचदेव, प्रशांत बावनकर, अजय अग्रवाल आणि राजेश अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी सहभागी झाले होते.
व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धा असली तरी परस्पर स्नेह, सहकार्य आणि बंधुभावाची भावना जपण्याचा संदेश देणारे ‘व्यापारी मिलन २०२६’ हे आयोजन व्यापाऱ्यांसाठी आनंददायी आणि अविस्मरणीय ठरले.





