कामठी :- भारताचे माजी पंतप्रधान, आधुनिक भारताच्या निर्मितीचे शिल्पकार आणि देशातील आयटी क्रांतीचे जनक, भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज कामठी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कामठी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कामठी नगर परिषद गटनेते काशिनाथजी प्रधान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचे स्मरण केले.
राजीव गांधी यांनी देशाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाकडे घेऊन जाण्यासोबतच संगणक व दूरसंचार क्षेत्राला चालना देत भारताच्या विकासाला नवी दिशा दिली. युवकांना देशाच्या प्रगतीच्या केंद्रस्थानी आणण्याचे त्यांचे योगदानही यावेळी उपस्थितांनी विषद केले.
कार्यक्रमास महिला काँग्रेस अध्यक्षा इशरत खान, नगरसेवक अनिल सूर्यवंशी, साजिद कमाल अन्सारी, राजेश कांबळे, एम. ए. जब्बार, आशिष मेश्राम, दिनू नागदेवे, फिरोज अन्सारी, अशोक भिमटे, प्रकाश लाईनपांडे, त्रिभुवन भिवगडे, अलंकार गजभिये यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





