spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अतिक्रमणाविरोधात तहसीलदार गणेश जगदाळे यांची धडक; खसाळा-भिलगावात अतिक्रमणे जमीनदोस्त

कामठी :- खसाळा-भिलगाव परिसरातील शासकीय जागेवरील अतिक्रमणांविरोधात तहसीलदार गणेश जगदाळे यांनी थेट मैदानात उतरून धडक कारवाई केली. तहसीलदार गणेश जगदाळे यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून कारवाईचे नेतृत्व केले. त्यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवून अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून नियमांना बगल देणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले. तहसीलदार गणेश जगदाळे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, अतिक्रमणधारकांमध्ये प्रशासनाच्या धडक भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.

खसाळा-भिलगाव परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पूर्ण केली. शासकीय मालमत्तेचे संरक्षण आणि अनधिकृत अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

तहसीलदार गणेश जगदाळे यांच्या थेट उपस्थितीत झालेल्या या कारवाईमुळे ‘अतिक्रमण कितीही जुने असो, प्रशासनाच्या कारवाईपासून सुटका नाही’ असा स्पष्ट संदेश परिसरात गेला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.