कामठी :- नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सईद नगर परिसरातील एका कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्याने घरातून रोख रकमेसह दागिने व मोबाईल असा एकूण सुमारे १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सकाळी 10 दरम्यान घडली. याप्रकरणी फिर्यादी वसीम अखतर कलिम अखतर वय 34 वर्षे रा सईद नगर कामठीने नवीन कामठी पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसानी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या सासऱ्याची प्रकृती ची विचारपूस करण्यासाठी बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने फिर्यादी च्या बिल्डिंग वरील वरच्या मजलयावरील बेडरूम चे दार उघडून घरात अवैधरित्या प्रवेश करून चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये २ हजार रुपयांच्या दहा नोटा, चांदीचे पैंजण (वजन सुमारे ३ ग्रॅम, किंमत अंदाजे ५०० रुपये), सोन्याची अंगठी (वजन सुमारे १ ग्रॅम, किंमत अंदाजे ३ हजार रुपये) तसेच सॅमसंग कंपनीचा मोबाईल यांचा समावेश आहे.
अज्ञात चोरट्याने हा मुद्देमाल लंपास केल्यानंतर फिर्यादीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली. त्यानुसार नवीन कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरीच्या मुद्देमालाचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.





