spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वस्तीगृहाला मिळाली आदर्श वस्तीगृहाची उपमा

सचिन चौरसिया, रामटेक ७ :- श्री संत गजानन महाराज मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह रामटेक येथे सुखदेव कौरती समाज कल्याण अधिकारी तसेच योगेश कढऊ वसतिगृह निरीक्षक, सचिन रामटेके यांनी (दि.31) ला अचानक भेट दिली असता वसतिगृहाची  तपासणी करण्यात आली. मुलांसाठी असलेल्या सोई सुविधा बघत वसतिगृहाला आदर्श वसतिगृह म्हणत वसतिगृहाची स्तुती केली , तसेच सरांच्या उपस्थितीत मुलांना शाळेचा गणवेश, शालेय साहित्य तसेच तेल, पावडर, शाम्पू, साबण ई. वस्तूचे वाटप करण्यात आले. या वेळी वसतिगृहाची उपस्थिती ही शंभर टक्के होती. मी सुद्धा तुमच्या सारखे वसतिगृहात शिक्षण पूर्ण केले असे सांगत मुलांना शुभेच्छा दिल्या. समाज कल्याण अधिकारी सुखदेवजी कौरती यांचे स्वागत वसतिगृह अध्यक्षा अनिता  दियेवार यांच्या हस्ते केले तर वसतिगृह निरीक्षक योगेशजी कढऊ यांचे स्वागत सचिव रवींद्र दियेवार यांनी केले. यावेळी वसतिगृह अधिक्षक सत्यम कावरे, कौतिका यादवार, गजानन कावरे, मारुती आत्राम, तुषार घसाळ आणि कर्मचारी उपस्थित होते

Popular Articles