spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

इवल्याशा राखीतून जन्म घेतील, वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी “रक्षाबंधन”

समर्थच्या चिमुकल्यांनी साकारल्या पर्यावरणपुरक राख्या

सचिन चौरसिया, रामटेक ७ -: रक्षाबंधन हा उत्सव पर्यावरणपूर्वक साजरा व्हावा, आणि त्यातून शून्य कचरा निर्मिती व्हावी, समर्थ प्राथमिक शाळा येथे “बीज राखी कार्यशाळा”, व “तीरंगी राखी बनविणे” कार्यशाळा”आयोजित  करण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत मुलांनी विशेषतः घरगुती सामुग्रीचा वापर करून मनमोहक अशा राख्या साकारल्या होत्या.
शनिवार (दि.२) ऑगस्टला मुख्याध्यापिका कविता जंजाळ यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांकडून राखी बनविण्याबाबद कार्यशाळा आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांकडुन हिरव्या, लाल, शेंद्री, गुलाबी रंगाचे कडधान्य जसे, भोपळा, मका, टरबूज, वाटाणे, शेंगदाणे, चना, मुंग, धने, मोहरी आदी वाणांचे बीज  वापरून विद्यार्थ्यांनी मोहक राख्या बनविण्यात आल्या. राखी उत्सवानंतर राख्या कुंडीमध्ये मातीत पुरवल्यास त्यातील बिजांपासून रोपे येतील, आणि त्यासाठी वापरलेला दोरा व कागद हे मातीत विघटित होतील,  व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. सुमारे ४३३ विद्यार्थ्यांनी बीज राखी कार्यशाळेमध्ये भाग घेतला होता. समर्थ प्राथमिक शाळेत प्रत्येक सण पर्यावरणपूरक साजरा केला जातो. समर्थ प्राथमिक शाळा नेहमी प्रयत्न करत असते हे येथे विशेष.

 नवनविन उपक्रमांसाठी शाळेचा पुढाकार

नवनविन उपक्रम चिमुकल्या विद्यार्थ्यांकडुन करवुन घेणे, विशेषतः पर्यावरणपुरक उपक्रम चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सानिध्यातुन पार पाडणे यात समर्थ प्राथमिक शाळा नेहमीच अग्रेसर राहात असते. येथे नुकत्याच पार पडलेल्या ” बिज व तिरंगी राखी ” कार्यशाळेत विद्यार्थ्यांना, देशी बियांपासून संपूर्णपणे पर्यावरणपूरक राखी कशी बनवावी, याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे महत्त्वदेखील कळते. शाळेच्या मुख्याध्यापिका कविता जंजाळ यांनी  समजावुन सांगण्यात आले.

Popular Articles