किशोर साहू, मौदा :- गट ग्रामपंचायत सिरसोली अंतर्गत येणाऱ्या वायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पटांगणात चिखल असल्याचे वृत्त विविध मराठी व हिंदी दैनिकांमध्ये प्रसारित होताच, वृत्ताची दखल घेत ग्रामपंचायत तर्फे 7 ट्रॅक्टर रेती टाकून चिखलयुक्त पटांगण चिखलमुक्त केल्याचे मंगळवार (ता. 25 ऑगस्ट) सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान रेती टाकल्याच्या व्हिडिओ पाठवून व भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून गट ग्रामपंचायत सिरसोली चे वायगाव येथे राहणारे ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ गायधने यांनी संबंधित प्रतिनिधीला सांगितले. गट्टू लावण्याबाबत विचारपूस केली असता ,गट्टू लावण्याचे प्रस्ताव पाठविले आहे. प्रस्ताव मंजूर होताच गट्टू पण लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. पटांगण चिखलमुक्त झाल्याने शाळेतील विद्यार्थी मनसोक्तपणे पटांगणावर खेळताना दिसले.
….अखेर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायगाव येथे रेती टाकून पटांगण केले चिखलमुक्त, गट्टूही लावणार: ग्रा पं सदस्य जगन्नाथ गायधने


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.




