spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“लोकांशी संपर्क वाढवा, तरच पक्ष वाढेल; केवळ पदाने पक्ष मजबूत होत नाही” – आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे कार्यकर्त्यांना परखड आवाहन

हंसराज,भंडारा :- पक्ष मजबूत करायचे असेल तर गरिबांची कामे करा, त्यांना शासनाच्या योजना मिळवून द्या तरच त्यांच्याशी तुमची नाळ जुडेल. लोकांमध्ये संपर्क वाढला कि पक्षाला बळ मिळेल. फक्त पद मिळाल्याने पक्ष मजबूत होत नाही असे विचार आम. नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले. ते भंडारा जिल्हा शिवसेना संगाठच्या आढावा बैठकीत अध्यक्ष म्हणून बोलत होते. या बैठकीत जिल्हा प्रमुख अनिल गायधने, लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर सह अन्य पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे या वेळी छावा चालक मालक संगठ्नेचे आणि सावरी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रहर संगाठ्नेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, ज्यांचे आमदार भोंडेकर यांनी भगवा दुपट्ट्याने स्वागत केला.

बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. ज्या नंतर जिल्हा प्रमुख अनिल गायधने यांनी जिल्ह्यातील संगठ्नेचा आढावा दिला. याच प्रमणे जिल्ह्यातील सातही तालुक्यातून आलेल्या तालुका प्रमुखांनी आपल्या क्षेत्रातील आढावा प्रस्तुत करून त्यांना येणाऱ्या समस्या ठेवल्या. ज्या वर तोडगा काढण्या करिता आत्ता तालुका स्तरावर पत्येक महिन्याला एक बैठक घेण्याचे आश्वासन आम. नरेंद्र भोंडेकर यांनी दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार भोंडेकर पुढे म्हणाले कि, पुढील गेल्या विधान सभा व लीक्साभेच्या निवडणुकीतपक्षाच्या प्रदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामे केली असली तरीही आज पक्ष जिल्ह्यात आव तसा मजबूत नाही आहे. या करिता पदाधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील गोर गरिबांची कामे करून देणे तसेच शासनाच्या योजना गरजूंना मिळवून देण्याची आवश्यकता आहे. ज्या मुले नागरिकांची नाळ पक्षाशी जुळून येईल आणि पक्ष बांधणीला आधार मिळेल. या करिता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले कि भंडारा नगर परिषदेचा ३२ कोटींचा असलेला बजेट हा गेल्या काळात १०० कोटी पर्यंत गेला. ज्या मुले विकास कामे हि शक्य झाली. पुढे जीलापारीशादेची निवडणुका आहेत, त्यात आपले अधिकाधिक उमेदवार कसे निवडून येतील या करिता पदाधिकाऱ्यांनी आपल्या शेत्राचा सर्वे करून कामे करणे गरजेचे झाले आहे. तरच जिह्यातील संपूर्ण जिल्हा परिषद आणि गरम पंचायतींवर निवडणुका लढणे शक्य होईल. एवढेच नाही तर शिवसैनिक म्हणून आपल्या क्षेत्रात ओळख निर्माण झाली पाहिजे. कुणी जर विकासकामांच्या विरोधात गेला तर त्याला शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देणे गरजेचे आहे. या सर्व बाबींकडे लक्ष द्याल तरच आपला पक्ष जिल्ह्यात क्रमांक एक वर यायला वेळ लागणार नाही. या बैठकीचे संचालन उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे यांनी केले. या वेळी मंचावर उप जिल्हा प्रमुख विकास मदनकर, उप जिल्हा प्रमुख विजय काटेखाये, उप जिल्हा प्रमुख किशोर पंचभाई, उप जिल्हा प्रमुख नरेश उचीबगले, महिला आघाडी जिल्हा प्रमुख साविताताई तुरकर, युवा सेना प्रमुख अंकुश वंजारी, नितीन सेलोकर, माजी जिला परिषद उपाध्यक्ष दीपक गजभिये, न.प. गटनेता राजू धुर्वे, जिल्हा संघटक नितीन धकाते, भंडारा तालुका प्रमुख संजय आकरे, दत्तू जगनाडे, पवनी तालुका प्रमुख जितेश इखार, व रोशन काटेखाये, माजी नगराध्यक्ष बाबू बागडे, मुकेश थोटे, नगर सेवक विनयम्हण पाशिने, पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले, भंडारा महिला तालुका प्रमुख विद्या मेहर सह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.