भंडारा :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, विविध विकासकामांचा आढावा घेणार आहेत.
मंत्री भोसले २७ ऑगस्ट रोजी रात्री चामोर्शीहून भंडारा येथे दाखल होतील. शुक्रवारी २८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह येथे भंडारा-गोंदिया सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांची आढावा बैठक व सादरीकरण होणार आहे.
त्यानंतर दुपारी १२:४० वाजता ते प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), राज्य उत्पादन शुल्क कार्यालय इमारत आणि इतर सार्वजनिक बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी करतील. पाहणी दौरा आटोपल्यानंतर ते नागपूरकडे प्रयाण करतील.





