spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘नारे तकबिर अल्ला हो अकबर’ च्या गजराने दुमदुमले कामठी शहर

– ईद ए मिलादुन्नबी निमित्त कामठीत भव्य ‘मिरवणूक’

कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त 26 ला कामठीत भव्य मिरवणूक काढण्यात आली .या मिरवणुकीत ‘नारे तकबिर अल्ला हो अकबर ‘च्या गजराने संपूर्ण कामठी शहर दुमदुमले होते.

मोहम्मद अली मंच रुईगंज कामठी परिसरातून मरकजी सिरतूनब्बी सोसायटीचे अध्यक्ष हाजी मोहमद हनिफ अशरफी जलाली बाबा यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ईद ए मिलादुनब्बीच्या मिरवणुकीला सकाळी 10 वाजता प्रारंभ करण्यात आला होता.याप्रसंगी कामठी नगर परिषद चे नगराध्यक्ष अजय अग्रवाल, माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर,माजी नगराध्यक्ष शकुर नागानी, माजी नगराध्यक्ष रतनलाल बरबटे, माजी उपाध्यक्ष अजय कदम, गटनेता काशिनाथ प्रधान,नगरसेवक नियाज कुरेशी,नगरसेवक अनिल सूर्यवंशी, नगरसेवक आकाश भोकरे, नगरसेवक धीरज यादव,अश्फाक कुरेशी,मो इर्शाद शेख, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, एसीपी अंकुश खेडेकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे,कांग्रेस चे माजी कामठी शहराध्यक्ष कृष्णा यादव,राजेश कांबळे,अलंकार गजभिये, दिनू नागदेवे, आशिष मेश्राम,मंगेश खांडेकर, मरकजी सिरतूननबी सोसायटीचे,महासचिव युसूफ इकबाल कुरेशी,सहसचिव नूर मोहम्मद नूरी,कोषाध्यक्ष तारीक अहमद कुरेशी, नियाज अहमद कुरेशी,मो अक्रम याकूब शेख,हाजी नासिर भाटी, मो जाफर लाला, अश्फाक कुरेशी, मो अलीमुद्दीन तेवर, मो फारूक शब्बीर,इर्शाद कुरेशी, , गफ्फार भाटी आदी गनमान्य नागरिक उपस्थित होते.

ही मिरवणूक मो अली गंज क्रीडांगणावरून निघत शुक्रवारी बाजार, गोयल टॉकीज चौक, गांधी चौक, पोरवाल चौक, फेरूमल चौक, तंबाकू ओली,गुजरी बाजार,दारोगा मस्जिद रोड,वारीसपुरा गालिब रोड,फुटाना ओली चौक,काल भैरव मंदिर रोड,नया बाजार,पिली हवेली,कोळसा टॉल मस्जिद,भाजी मंडी, कुरेशी नगर, मदन चौक, भोई पुरा रोड,कादर झेंडा, मच्चीपुल,जुनी भाजी मंडी, मुमताज चौक, लाला ओली चौक, हुसैनाबाद, मोटर स्टँड चौक,जयस्तंभ चौक,लकडगंज, भोई लाईन,येरखेडा रोड, आदी मार्गे शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत रुईगंज मैदानात मोहमम्द अली जौहर मंच,मोहम्मद अली गंज येथे पोहोचून मिरवणुकीचे समापन करण्यात आले.मिरवणुकीत डिजेवरील धार्मिक गीते,ध्वज फिरवणारे युवक,पारंपरिक वेशभूषेत सहभागी समाजबांधव असा मिरवणुकीचा थाट होता.मिरवणुकीत लहानापासून ते मोठ्या वयाच्या समाजबांधवाणी सहभाग दर्शवून नारे तकबिर अल्ला हो अकबरची गर्जना केली. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले . व प्रसादाचे वितरण करण्यात आले..मिरवणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे,वाहतूक पोलीस निरीक्षक बन्सोड यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावून खुद्द उपस्थिती दर्शवून कर्तव्यदक्ष भूमीका साकारली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.