spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नेपाळमध्ये अडकलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा

– जिल्हा प्रशासनाचे आवाहन; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर माहिती संकलन सुरू

पांढरकवडा :- नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती संकलित करण्यात येत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, अशा व्यक्तींनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेल, प्रवासाचा तपशील तसेच कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास प्रशासनाला द्यावा.

यासाठी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे ०७२३२-२४०७२० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ८३०८७५४४७३ (व्हॉट्सॲप) या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. आपत्तीग्रस्त भागातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.