spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शाहीर गजानन वडे यांना नागपुर सिटी आयकॉनिक पुरस्कार २०२६ देऊन सत्कार 

कन्हान :- येथील रहिवासी शाहीर गजानन वडे भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया चे महाराष्ट्र संघटन प्रमुख यांचे भव्य शाहीर कलाकार मेळावा मध्ये जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, शिवसेना नेते राधेशाम हटवार,शाहीर राजेंद्र बावनकुळे , नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शाहीर गजानन वडे हे आकाशवाणी कलावंत उत्कृष्ट भजन गायन, पोवाडे गायन च्या माध्यमातुन समाज प्रबोधन करित आहे, तसेच भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया चे महाराष्ट्र भर मेळावे होते त्या मेळावा मध्ये तन मन धनाने मदत करून प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करित आहेत. त्यांच्या या सर्व कामाची दखल घेऊन कार्यकारणी मंडळ यांनी एकमताने पुरस्कार साठी निवड करण्यात आली. गजानन वडे यांनी सत्कार स्विकार करतांनी सर्व शाहीर कलाकार आणि पाहुणे यांचे आभार मानले.

Popular Articles