spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एकात्मता विद्यालयात रक्षाबंधनाचा उत्साह

नागपूर :- एकात्मता उच्च प्राथमिक विद्यालय, एकात्मता नगर, जयताळा, नागपूर येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शाळेत विविध प्रकारच्या आकर्षक व रंगीबेरंगी राख्या स्वतः तयार केल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा व कलागुणांचा सुंदर आविष्कार घडवत विविध कलात्मक राख्या बनविल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांना प्रेम, आपुलकी व बंधुभावाचे प्रतीक असलेल्या राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण आनंदाने साजरा केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, बंधुभाव, सहकार्य, स्नेह आणि सामाजिक एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे शाळेचे वातावरण आनंदमय झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होत रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित केला.

Popular Articles