spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विलास गजघाटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

नागपूर :- परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. विलासजी गजघाटे यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. दीक्षाभूमीच्या पवित्र कार्याला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी विलास गजघाटे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या नेतृत्वातून दीक्षाभूमीच्या कार्याला अधिक व्यापक दिशा मिळावी, अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. “दीक्षाभूमीच्या पवित्र कार्यात आपले मार्गदर्शन व नेतृत्व सदैव लाभत राहो. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख- समृद्धी आणि सामाजिक कार्यासाठी नवी ऊर्जा लाभो,” अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी हंसराज भांगे, दीक्षाभूमी ट्रस्टी एन.आर.सूटे, फिशरी बोर्ड महासंघाचे अध्यक्ष प्रेम गजभिये, नरेश महाजन, रिपाईचे शहर महासचिव रजत महेश गवडी, सुभाष शेंडे आदींनी मनोगत व्यक्त करून विलास गजघाटे यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन शरद मेश्राम यांनी केले. यावेळी देवाजी रंगारी, विठ्ठल ढोंगडे, विजय सुरवाडे, अशोक शेंद्रे, सुनील भोसले, मिलिंद थुल, विजय मेश्राम, अमोल पाटील, रामभाऊ बागडे, विशाल शुक्ला यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles