spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

EPTB व बालकांमधील क्षयरोग विषयावरील CME कार्यक्रम संपन्न

– सार्वजनिक शासकीय व खाजगी समन्वयातून क्षयरोग निर्मूलनाला बळ देण्याचे आवाहन

नागपूर :- राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) अंतर्गत भारताला क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. क्षयरोगाचे केवळ फुफ्फुसीय स्वरूपच नव्हे, तर Extrapulmonary Tuberculosis (EPTB) तसेच बालकांमधील क्षयरोग (Paediatric Tuberculosis) यांचे वेळेवर निदान, योग्य उपचार आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे. याच अनुषंगाने HLFPPT (SSHAKTI Project) यांच्या वतीने City TB Office, महानगरपालिका नागपूर आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (IGGMC) नागपूर यांच्या सहकार्याने EPTB व Paediatric Tuberculosis या विषयावर CME कार्यक्रमाचे आयोजन २१ ऑगस्ट २०२६ रोजी हॉटेल तुली इम्पीरियल, रामदासपेठ, नागपूर येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमास नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूरच्या Tuberculosis & Respiratory Medicine विभागाच्या प्रमुख डॉ. राधा मुंजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूरच्या Tuberculosis & Respiratory Medicine विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नागपूरचे अध्यक्ष डॉ. सचिन गाठे, IGGMC नागपूरचे उप-अधिष्ठाता डॉ. गोपाल अग्रवाल तसेच HLFPPT चे व्यवस्थापकीय संचालक HLFPPT–SSHAKTI Project चे Coordination Person डॉ. किशोर रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची प्रास्ताविक भूमिका मनपाचे शहर क्षयरोग तज्ञ डॉ. शिल्पा जिचकार यांनी केली. तसेच दोन्ही म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ,नागपुर येथील आणि इंदिरा गांधीं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील NTEP चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सदाफ खातिब आणि डॉ. विनय माहेश्वरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनपा नागपूर चे DPPM समन्व्यक संगीता शिंगणे यांनी केले

या CME मध्ये EPTB आणि बालकांमधील क्षयरोगाच्या निदान व उपचारातील विविध आव्हानांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः बालकांमधील क्षयरोगाचे निदान अनेक वेळा आव्हानात्मक ठरते. तसेच EPTB हा शरीरातील विविध अवयवांवर परिणाम करू शकत असल्याने त्याचे लवकर निदान करून योग्य उपचार सुरू करणे आवश्यक आहे. उपचार पूर्ण होईपर्यंत रुग्णांचे नियमित follow-up आणि उपचारातील सातत्य राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासकीय व खासगी आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांना एकत्र आणून क्षयरोगाच्या प्रभावी प्रतिबंध, निदान, उपचार आणि रुग्णांच्या नियमित पाठपुराव्यासाठी समन्वय अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या कार्यक्रमात Public–Private Coordination अधिक मजबूत करण्याच्या गरजेवर विशेष भर देण्यात आला. शासकीय व खासगी क्षेत्रातील डॉक्टर, वैद्यकीय संस्था आणि NTEP यांच्यातील प्रभावी समन्वयामुळे TB Notification, लवकर निदान, उपचाराची सुरुवात, उपचारातील सातत्य आणि उपचाराचा परिणाम यामध्ये निश्चितच सुधारणा होऊ शकते. क्षयरोगाच्या रुग्णांपर्यंत वेळेवर आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी आरोग्य यंत्रणेने एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

या CME मध्ये तज्ज्ञांकडून क्षयरोगाच्या अद्ययावत निदान पद्धती, उपचार, बालकांमधील TB ची ओळख, EPTB व्यवस्थापन तसेच रुग्णांच्या उपचारातील adherence आणि follow-up संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या दैनंदिन वैद्यकीय सेवेत या ज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले.

Popular Articles