spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पीएमश्री शाळा दहेगाव येथे विद्यार्थ्यांकडून राखी बनवण्याचे उपक्रम

किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे राखी या सण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याकडून राखी बनवण्याचं उपक्रम घेण्यात आले. राखी या सणाचे महत्त्व मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी विद्यार्थ्यांना केले. राखी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करून त्या गटात राख्या बनवण्यात आल्या.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध आकाराच्या योग्य, आकाराच्या विविध राख्या बनवण्यात आला. सुरुवातीला शिक्षिका सुजाता बोदेले यांनी राख्या कशा बनवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या उपक्रमांतर्गत प्रथम क्रमांक मंथन आंबीलढुके वर्ग सातवा, द्वितीय क्रमांक स्वरा होमराज हटवार या विद्यार्थ्यांचा आला.

याप्रसंगी बहिण भावामध्ये कसे प्रेम निर्माण होईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगावातील विद्यार्थिनीनी विद्यार्थ्यांना राखी बांधल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे,सुधीर खंडाईत, सुधीर कांबळे,राजेश रोहाड, सुजाता बोधले , प्रज्ञा रामटेके , संगीता कारेमोरे , ज्योती आंबिलढुके, उमेश उके,पुष्पलता उके यांनी सहकार्य केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.