बेला :- येथील मुस्लिम समाज बांधवांनी सुन्नी हनफी जाम मजीद मधून भव्य जुलूस काढून ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा केला.यावेळी मार्गाने नागरिकांना ठिकठिकाणी बुंदीचे पॅकेट वाटप करण्यात आले. मज्जिद मध्ये सकाळी नमाज अदा केल्यानंतर डीजे लावून वाजत गाजत गावातील प्रमुख मार्गाने जूलस काढण्यात आला. हिरव्या,लाल तोरण पताका लावून मजीद परिसर सुशोभित करण्यात आला होता. रॅलीत मजीद कमिटीचे अध्यक्ष शेख गुड्डू उर्फ इरफान, उपाध्यक्ष नवाज अली, सचिव अल्ताफ शेख, शेख बब्बू, रशीद भाई मालाधरी, लतिफ पठाण, प्यारू शेख, रमजान पठाण, मौलाना व अनेक समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

नमाज नंतर समाज बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या. बसस्थानक नजीकच्या गाव तलाव पाळीवरील मुस्लिम कब्रस्तानातील गौस पाक छिल्ला शरीफ दर्गाह मध्ये जुलूसचा समारोप करण्यात आला. त्यानंतर बाजारातील मशीद मध्ये स्नेहभोजनाने ईद-ए-मिलादची थाटात सांगता झाली.ईद-ए-मिलाद निमित्य ग्रामसचिवालय कॉम्प्लेक्स मधील ख्वाजा ऑटोमोबाईल चे संचालक लतीफ पठाण यांनी नागरिकांना केळी वाटप केले व रक्तदान शिबीर घेतले.





