spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गोलेवाडी हॅन्डपंप निधीत भ्रष्टाचार; निवेदन नाकारणाऱ्या भंडारा सिओंची अरेरावी, भीम आर्मी आक्रमक

हंसराज, भंडारा :- तालुक्यातील गोलेवाडी ग्रामपंचायतीमध्ये हॅन्डपंप निधीत झालेल्या भ्रष्टाचाराचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (CEO) अरेरावीचा सामना करावा लागला. “मी तुमच्या कामासाठी बसलो नाही” असे वक्तव्य करत सिओ यांनी निवेदन नाकारल्याने आज जिल्हा परिषद परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. या प्रकारानंतर भीम आर्मीने तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाची तक्रार केली आहे.

नेमके प्रकरण काय?

ग्रामपंचायत गोलेवाडी येथे हॅन्डपंपच्या कामासाठी १ लाख ४५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. विशेष म्हणजे या कामाचे ऑनलाईन पेमेंटही काढण्यात आले आहे, परंतु प्रत्यक्षात गावात कोणतेही काम झाले नसल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे. हा सरळसरळ जनतेच्या पैशांचा अपहार असल्याचे सांगत भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष विक्रांत भालाधरे, पवनी तालुकाध्यक्ष शुभम लोणारे, भंडारा तालुकाध्यक्ष चेतन काणेकर व इतर पदाधिकारी आज २७ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद सिओ यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. सिओंची अरेरावी आणि वादावादी भीम आर्मीचे पदाधिकारी दालनात गेले असता, तेथे सुरू असलेल्या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यावरून सिओ संतप्त झाले. “व्हिडिओ का घेता?” असा सवाल करत त्यांनी निवेदन घेण्यास स्पष्ट नकार दिला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला असता, “मी तुमच्या कामासाठी बसलो नाही,” असे बेजबाबदार वक्तव्य सिओ यांनी केल्याचा आरोप विक्रांत भालाधरे यांनी केला आहे. यामुळे काही वेळ सिओ आणि भीम आर्मी पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

जिल्हा परिषद सिओ यांनी निवेदन नाकारल्यानंतर भीम आर्मीच्या शिष्टमंडळाने तात्काळ भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना गोलेवाडी भ्रष्टाचार प्रकरणाचे निवेदन देऊन सिओंच्या वागणुकीबद्दल तीव्र निषेध नोंदवला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.