spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

 सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील 37 भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना

· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारामुळे भाविकांची सुटका

मुंबई :- कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील 37 भाविक आज सकाळी 6 वाजता न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर भाविकांच्या परतीचा हा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे 37 भाविक कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान ते सागा येथे अडकून पडले. काठमांडूहून त्यांचे परतीचे विमान 29 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता नियोजित असल्याने वेळेत काठमांडू गाठणे आवश्यक बनले होते. भाविक अडकल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधला. मंत्रालयाकडून आवश्यक सहकार्य मिळाल्यानंतर भाविकांचा सागा ते काठमांडू असा सुरक्षित प्रवास सुरू झाला.

संकटाच्या प्रसंगी तातडीने मदत मिळाल्याबद्दल सर्व भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासन आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार मानले आहेत.

सुरक्षित परतलेल्या भाविकांची यादी:

Popular Articles