spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

– मोफत वर्ग सुरू करण्याचा संस्थेचा संकल्प

नागपूर :- साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त सम्राट प्रसेनजित सामाजिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूरद्वारा संचालित लहुजी विद्यार्थी संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम श्री साई सभागृह, शंकरनगर चौक येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा व करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संस्थे च्यावतीने दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी JEE व NEET Advanced चे मोफत वर्ग सुरू करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. ही संस्था निशुल्क कोचींग देते तसेच बर्डी परिसरातील संस्थेच्या अकादमीत इंग्लिश स्पीकिंग, व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीचे मोफत वर्ग सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

प्रमुख मार्गदर्शक व अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. JNU दिल्लीचे प्रा.डॉ.मिलिंद आव्हाड व डॉ. आशिष तायवाडे यांनी उच्च शिक्षण, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती व करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. उद्योजक संजय सोनटक्के यांनी डॉ. सुरज लोखंडे यांच्या MDS व Oral Surgery च्या पुढील शिक्षणासाठी २ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुचेता कांबळे उपस्थितीत होत्या. मुख्य संयोजक प्रभाकर शिंदेसह, यावेळी न्यायाधीश सुधीर वानखेडे, उद्योजक संजय सोनटक्के, गजानन सनेसर, प्रशांत अवसरे, प्रवीण ढोके व पोलीस निरीक्षक महादेव खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा तसेच दहावी- बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. किरणकुमार मनुरे, इंजि रविन्द्र खांडेकर, राजू वानखेडे, राजू खडसे, सोहम ठाकरे, सुभाष साळवे, शेखर गवळी, प्रशांत वानखेडे, प्रकाश लोखंडे, आकाश सऩेश्वर, विनोद बावणे रिंकू शनेश्वर इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन कविता ताकतोडे तर प्रास्ताविक प्रभाकर शिंदे यांनी केले व आभार सचिन तेलंगे यांनी मानले.

Popular Articles